काँग्रेससोबतचे सर्व प्रस्ताव संपले, काँग्रेसशी आघाडी नाही : प्रकाश आंबेडकर
बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरील संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा आज अकोल्यात केली. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. येत्या १५ मार्चला राज्यातील ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
मुंबईतील बैठकीनंतरच वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोलापुरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढवणार आहेत. आंबेडकर यांच्या उमदेवारीने शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असे मानले जाते.
