उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या सतरा जानेवारीला, पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओ लस देण्यात येणार
उस्मानाबाद: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या सतरा जानेवारी रोजी, पाच वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे.
या योजनेत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून, अधिकाधिक बालकांना पोलिओ लस देण्याच्या सूचना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड यांनी दिल्या आहेत.
