“अधिक जोमाने कार्यरत रहा” – गृहमंत्री अनिल देशमुख
पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे.
हे सर्व अधिकारी अधिक जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
