मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट
नवी दिल्ली, दि.८: मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत थोड्याच वेळापूर्वी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठा आरक्षण समितीचे प्रमुख अशोक चव्हाण हेही सोबत होते.
जवळपास दीड ते पावणेदोन तास ही बैठक चालली. या संदर्भातील फोटो मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडल वरून ट्विट करण्यात आला. यावेळी जीएसटी सह इतर अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे कळते.
