“३० नोव्हेंबर पर्यंत मिळणार मोफत धान्य” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मागणीची पंतप्रधानांकडून पूर्तता
नवी दिल्ली/मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधताना काही महत्वाच्या घोषणा केल्या. त्यातली महत्वाची घोषणा म्हणजे मोफत अन्न धान्य योजनेस ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा देशातील ८० कोटी जनतेला होणार आहे. या योजनेअंतर्गत गेल्या तीन महिन्यांपासून दर माणशी दर महिना ५ किलो गहू किंवा तांदूळ व एका कुटुंबाला १ किलो चणाडाळ मिळतेय.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत धान्य योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. याबाबतचा पाठपुरावाही त्यांनी केंद्राकडे केला होता. आजच्या पंतप्रधानांच्या घोषणेमुळे ही मागणी मान्य झाल्याचे पाहायला मिळत आहे. व याचा देशातील सर्व राज्यांना एका अर्थी फायदा होणार आहे.
