स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं ‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रधानमंत्र्यांचं आवाहन
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून ते आज देशातल्या नागरिकांशी संवाद साधत होते.
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात देशात जलसंरक्षणावर भर दिला जातो आहे. या कालावधीत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी देशातल्या नागरिकांना केलं. आपल्या पूर्वजांनीही जलसंरक्षणावर भर दिल्याची आठवण त्यांनी करुन दिली. यावेळी त्यांनी वाल्मिकी रामायण, सिंधू, हडप्पा संस्कृतीतली उदाहरणं लोकांना सांगितली. देशातल्या विविध भागात जल संरक्षणासाठी होत असलेल्या पारंपरिक उपायांची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली.
