प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या स्थापनेपासून गेल्या वर्षीपर्यंत सुमारे एक कोटी ३४ लाख उमेदवारांना प्रशिक्षण
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या स्थापनेपासून गेल्या वर्षीपर्यंत सुमारे एक कोटी ३४ लाख उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत दिली.
एका लेखी उत्तरात त्यांनी सांगितलं की, कोविड-१९ चा प्रभाव कमी करण्यासाठी मंत्रालयाने कौशल्य परिसंस्थेच्या अंतर्गत ई-स्किल इंडिया पोर्टल आणि भारत स्किल पोर्टलद्वारे ऑनलाइन कौशल्य प्रशिक्षण, कोविड योद्ध्यांसाठी गरजेनुसार अल्प कालावधीचे कार्यक्रम, सहा राज्यांमध्ये PMKVY अंतर्गत स्थलांतरितांच्या प्रशिक्षणासाठी विशेष कार्यक्रम असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
