NAMO TWEET
अभिनंदन यांच्या सुटकेनंतर भारताचा ‘पायलट’ प्रोजेक्ट यशस्वी : पंतप्रधान नरेंद्र मोदी
हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठं यश आलं आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी सुटका होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत केली.
अभिनंदन यांच्या सुटकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विज्ञान भवनात भाष्य केलं. एक पायलट प्रोजेक्ट सुरू होता. तो पूर्ण झाला. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सुरु असलेल्या शांतीस्वरुप भटनागर पुरस्काराच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी सुरुवातीला उपस्थितांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत भाष्य करताना मोदी म्हणाले, आता केवळ प्रॅक्टिस होती खरं काम तर नंतर करु. अशा शब्दांमध्ये मोदींनी अभिनंदन यांच्या सुटकेवर भाष्य करत पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला.
