पंतप्रधान येत्या १ एप्रिल २०२२ रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे आयोजित करण्यात येत असलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत. तणावमुक्त परीक्षा याबद्दल ते बोलणार आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधानांनी म्हणाले;
“चला पुन्हा एकदा तणावमुक्त परीक्षांबद्दल बोलूया! गतीमान #ExamWarriors, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना १ एप्रिल रोजी या वर्षीच्या परीक्षा पे चर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन करत आहोत.”
