एप्रिलमधील मन की बात साठी सूचना पाठवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
एप्रिल महिन्याच्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना ट्वीटर द्वारे आवाहन केलं आहे. या महिन्यात मन की बात कार्यक्रमात कोणत्या विषयाची चर्चा व्हावी असे आपणास वाटतं? कोणती प्रेरणादायी गोष्ट आपल्या भारतीय नागरिकांना सांगावीशी वाटते? आपल्या कल्पना माय गोव्ह, नमो अप्लिकेशनवर किंवा ध्वनीमुद्रित संदेश २२ एप्रिल पर्यंत पाठवू शकतात.
जागतिक कोरोना संकटाच्या छायेत पंतपधान नरेंद मोदी रविवार २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरुन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा ७६ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी 1800 117800 क्रमांकाच्या माध्यमातून संपर्क करु शकतात.
