‘पहले मतदान फिर जलपान – पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोकसभा निवडणूकतील पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झाली आहे. देशाच्या विविध राज्यातील ९१ मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये म्हणतात की, ”लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात नक्की सहभागी व्हा अशी माझी सर्वांना विनंती आहे. जास्तीत- जास्त संख्येने मतदान करा. ‘पहले मतदान फिर जलपान’ असा संदेशच त्यांनी दिला आहे”.
लोकसभा चुनावों के लिए आज पहले चरण का मतदान है।
सभी मतदाताओं से मेरी विनती है कि लोकतंत्र के इस महोत्सव में जरूर हिस्सा लें।
अधिक-से-अधिक संख्या में मतदान करें। पहले मतदान, फिर जलपान!
— Narendra Modi (@narendramodi) April 11, 2019
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, सिक्कीम, आसाम, बिहार, छत्तीसगड, मणिपूर, तेलंगणा, मिझोराम, नागालँड, बंगाल या ठिकाणी पहिल्या टप्यातील मतदान होत आहे.
