पंतप्रधानांची उद्या ‘मन की बात’; लॉकडाऊन बाबत करू शकतात मोठी घोषणा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ७४वा भाग आहे. देशात काही राज्यांत रुग्णवाढीचे प्रमाण वाढताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पुनः एकदा लॉकडाऊन जाहीर करतील का हा सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न आहे. ज्याबाबत उद्या काही बोलतील का याकडे देशाचे लक्ष लागून राहिला आहे.
आकाशवाणी, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम थेट ऐकता येईल. या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुनःप्रसारण केलं जाईल.
