पिंपरी चिंचवड महापालिकेने केली ‘मी जबाबदार’ अॅपची निर्मिती
पिंपरी-चिंचवड: कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘मी जबाबदार’ या अॅपची निर्मिती करण्यात आली असून अॅन्ड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर ते मोफत उपलबध आहे. नागरिकांच्या गरजेनुसार महापालिकेच्या वतीने ‘मी जबाबदार’ या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे, असं आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितलं.