पिंपरी–चिंचवड लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट करण्याबाबत आम आदमी पक्षाचे महापालिकेला निवेदन
पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाला रोखण्याचा महत्त्वाचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट करण्यासंदर्भातील निवेदन आम आदमी पक्षाने काल महापालिकेला दिले. शहराची लोकसंख्या ३०,००,००० असून आतापर्यंत केवळ ७,००,००० नागरिकांचेच लसीकरण झाले आहे.
सध्याच्या राजकीय हस्तक्षेपामुळे सकाळपासून रांगा लावूनही काही नागरिकांचे लसीकरण होत नाही. पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर असल्याने येथील बहुसंख्य नागरिक कामगार आहेत, त्यामुळे या प्रक्रियेचा कामगारांना त्रास होत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.