Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बार्टी येथे सुरू असलेल्या पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला लाभले यश

सरसकट पात्र ८६१ विद्यार्थ्यांची यादी मंजूर; मान्यतेसाठी शासनाकडे रवाना

पुणे, दि. २: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे [बार्टी] BANRF-2021 साठी अर्ज केलेल्या सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करण्यात यावी. या मागणीसाठी पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने ३० जानेवारीपासून बार्टीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते. सरसकट पात्र ८६१ विद्यार्थ्यांची यादी मंजूर करून प्रसिद्ध करण्याची मागणी कृती समितीने केली होती. काल रात्री बार्टीकडून कृती समितीला एक पत्र देण्यात आले आहे. त्या पत्रात सरसकट ८६१ विद्यार्थ्यांना पात्र ठरवून निवड यादी शासनास मान्यतेस्तव पाठविण्यात आलेली आहे असे सांगण्यात आले आहे. प्राप्त पत्रास मान्य करून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. या आमरण उपोषण मध्ये कृती समितीच्या वतीने ईश्वर आडसुळ, प्रदीप ञिभुवन, सिद्धोधन मोरे, अनुप तायडे, यशवंत जाधव, संघमित्र गायकवा, सतीश सूर्यवंशी, किशोर तुपवहिरे, नितीन वानखडे, सूर्यभान इंगोले, प्रकाश तारू, सचीन दाढेल, माधव वाघमारे, देवानंद हानवते, साहूल छडीदार, रविद्र आठवले, लोंढे सर, किशोर ञिभुवन हे विद्यार्थी उपोषणात सहभागी होते .

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *