पतंजलीच्या कोविड १९ वरील औषधाच्या जाहिरातवर आयुष मंत्रालयाचे निर्बंध
नवी दिल्ली: बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदनं तयार केलेल्या कोरोनावरच्या औषधाची आयुष मंत्रालयानं दखल घेतली आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या दाव्यांविषयी किंवा त्यात नमूद केलेल्या वैज्ञानिक अभ्यासाविषयी कुठलीही माहिती नसल्याचं आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे.
यासंदर्भात औषधाचं नाव, त्यातले घटक, वैद्यकीय चाचण्यांचे तपशील आणि इतर सर्व माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तोपर्यंत यासंदर्भातले दावे प्रसिद्ध करु नये, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या आयुर्वेदिक औषधाचा परवाना आणि औषधाला देण्यात आलेल्या मंजुरीची माहिती कळविण्याचे आदेशही उत्तराखंड सरकारला देण्यात आले आहेत.
Source – AIR
