Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल

ठाणे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गेले दोन दिवस तक्रारदाराचा जबाब नोंदविल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

परमबीर सिंग यांच्यासह निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आदी अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातच परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे.

परमबीर यांच्याच आदेशाने प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी धमक्या देऊन साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा जालान आणि तन्ना आरोप यांनी केला होता.

मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करुन त्यातून सुटकेसाठी एक कोटी १८ लाखांची मागणी करुन सिंग यांच्या सांगण्यावरून शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना याने  तक्रारीत  केला आहे.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *