सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली; मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा दिला सल्ला
नवी दिल्ली:, दि. २४: सर्वोच्च न्यायालयानं मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग(Parambir Singh) यांची याचिका फेटाळून लावली आहे. सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल का केली नाही, अशी विचारणा करत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस नकार दिला आहे. तसेच या याचिकेत गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांना प्रतिवादी का बनवले नाही असा सावालही न्यायमूर्तींमार्फत करण्यात आला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती, आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी दाखल केली होती.
