Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी पंकजा मुंडेंचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवेही घेणार सहभाग

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी पंकजा मुंडेंचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवेही घेणार सहभाग

औरंगाबाद: मराठवाड्याच्या पाणीप्रश्ना संबंधी समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून स्वतंत्र जादा निधी मिळावा या मागणीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे एक दिवसाचा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. सकाळी दहा वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालया समोर त्या उपोषणाला बसणार आहेत. हा कार्यक्रम आधी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने होणार होता. पण आता या उपोषणात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे सहभागी होणार आहेत.

या संदर्भात काल एक ट्विट करत पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की हे उपोषण आक्षेपांसाठी नाही तर अपेक्षांसाठी आहे. पण आज या कार्यक्रमस्थळी ठाकरे सरकारवर इतर नेत्यांकडून टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *