राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचं पंढपुरामध्ये आंदोलन
पंढरपूर, दि.३१: पंढरपूर येथील विठ्ठल मंदीर उघडण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आज पंढरपुरात मंदिरासमोर आंदोलन करण्यात आलं. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितत हे आंदोलन करण्यात आलं होतं. मंदीर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ऍड. आंबेडकर यांना कायदा मोडण्याबाबत विचारणा केली असता, आम्ही इथं नियम पाळण्यासाठी नाही, तर नियम मोडण्यासाठी आलोय, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं.
थोड्याच वेळापूर्वी ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भरीव आश्वासन मिळाल्याचे सांगितले. ते म्हणाले, “राज्यात लवकरच लोकांसाठी मंदिर, मशीद, बुध्दविहार, जैन मंदिर सुरु केली जातील. त्यासाठी सरकार नियमावली तयार करणार आहे, अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली. आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरु होतील, असं आश्वासन सरकारने दिलंय.” अखेरीस सरकारला इशारा देत ते म्हणाले की, “सरकारने आश्वासन पाळले नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात दाखल होऊ.याची नोंद सरकारने घ्यावी.”
राज्यात लवकरच लोकांसाठी मंदिर,मशीद, बुध्दविहार,जैन मंदिर सुरु केली जातील.त्यासाठी सरकार नियमावली तयार करणार आहे,अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली.आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरु होतील,असं आश्वासन सरकारने दिलंय. pic.twitter.com/KzpiUnFkKc
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 31, 2020
