पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे ३ हजार ७३३ मतांनी विजयी
पंढरपूर, दि.२: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला आहे.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३ हजार ७३३ मतांनी पराभव केला आहे. आवताडे यांना १ लाख ९ हजार ४५०, तर भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मतं मिळाली.
