पालघर जिल्ह्यात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे कामकाज सुरु; जात पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि.११: आदिवासी विकास विभागांतर्गत पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे कामकाज दि. ६ जानेवारी २०२२ पासून सुरु करण्यात आले आहे. या तपासणी समितीमार्फत जात पडताळणी करण्यासाठी अर्ज स्वीकारण्याचे, वैधता प्रमाणपत्र देण्याचे तसेच इतर प्रशासकीय कामकाज करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व लाभार्थींनी सह-आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पालघर विभाग, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, वर्ग-४ चे कर्मचारी निवासस्थान, बिडकोनाका कचेरी रोड पालघर (पश्चिम)-४०१४०४, या पत्त्यावर संपर्क साधावा, असे सह आयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
