पद्म पुरस्कार-२०२३ साठी नाम निर्देशनं पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबरपर्यंत
पद्म पुरस्कार-२०२३ साठी नाम निर्देशनं पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबरपर्यंत आहे. पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कांरांपैकी समजले जातात. पद्म पुरस्कार-२०२३ साठी ऑनलाईन नामनिर्देशन आणि शिफारशींची प्रक्रिया १ मे रोजी सुरु झाली आहे. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाईल.
कला, साहित्य आणि शिक्षण, क्रिडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग या सर्व क्षेत्रांमधील अद्वितीय आणि अपवादात्मक कामगिरी आणि सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविना सर्व व्यक्ति या पुरस्कारांसाठी पात्र असतात असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
