राज्यातले ऑक्सीजनचे ५० टक्के उत्पादन वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवण्याचा राज्यसरकारचा केंद्राकडे प्रस्ताव
मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातलं ऑक्सीजनचं ५० टक्के उत्पादन वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव राज्यसरकारनं केन्द्राकडे ठेवल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोनाबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुणे इथं आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
सध्या राज्यातलं ऑक्सीजनचं केवळ १५ टक्के उत्पादन वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवलं जात असून COVID-19 च्या रूग्णांकरता पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्यसरकारचा हा प्रस्ताव असल्याचं टोपे यांनी सांगितले.
Source – AIR
