सीमा शुल्कातून सूट दिलेल्या वस्तूंच्या यादीत व्यक्तिगत वापरासाठी आयात केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपकरणांचा समावेश
नवी दिल्ली: केंद्र सरकारने, व्यक्तिगत वापरासाठी पोष्टाने, कुरियरने अथवा ई-वाणिज्य पोर्टलवरून व्यक्तिगत वापरासाठी मागवण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपकरणांचा समावेश, सीमा शुल्कातून “भेटवस्तू” या सदराखाली सूट देण्यात आलेल्या वस्तूंच्या यादीत केला आहे. ही सवलत ३१ जुलै २०२१ पर्यंत लागू असेल. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील, परदेश व्यापार महासंचालनालयाने ३० एप्रिल २०२१ ला जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, या विशिष्ट कारणाकरिता परदेश व्यापार नीती २०१५-२० च्या परिच्छेद २.२५ मध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात आली आहे.

