अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या उस्मानाबाद दौऱ्यावर
मुंबई : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतील.
