Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उस्मानाबादच्या विद्यार्थ्यांकडून अनोखा शोध; रोबो करून देणार मास्क लावण्याची आठवण

उस्मानाबादच्या विद्यार्थ्यांकडून अनोखा शोध; रोबो करून देणार मास्क लावण्याची आठवण

उस्मानाबाद: कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करणं आणि सॅनिटायझरनं वारंवार हात स्वच्छ करणं याची सवय लागणं आवश्यक असताना नेमकं हेच विसरलं जातं यावर उस्मानाबाद इथल्या तेरणा अभियंत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपाय शोधून काढला आहे.

या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून असा रोबो बनवलाय जो मास्क लावण्याची आठवण करुन देतो, व्यक्तीच्या तापमानाची नोंद दाखवतो तसंच हात धुण्यासाठी पाहुण्यांना सॅनिटायझर पुरवतो.

मिस मास्की असं या रोबोचं नामकरण करण्यात आलं असून अल्प किंमतीत बनवलेला हा रोबो सार्वजनिक स्थळं, मॉल, मल्टिप्लेक्स, रुग्णालयं इथं फायदेशीर ठरणार आहे.

रोबोचं पेटंट मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रमसिंह माने यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *