जीवनावश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
जीवनावश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं. या सुधारणेमुळे भरड धान्य, कडधान्य, तेलबिया, तेल, कांदा तसंच बटाटा हे जिन्नस जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले जातील. या वर्षी जून महिन्यात केंद्र सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेईल.
या सुधारणेनंतर शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन विकण्याचं स्वातंत्र्य मिळेल, तसंच मागणी आणि पुरवठा साखळीत संतुलन राखता येईल, असं अन्न अणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
धान्याचं उत्पादन आणि साठवणुकीसाठी हे विधेयक उपयुक्त ठरेल, असं ते म्हणाले. संसदेनं संमत केलेल्या या सुधारणा विधेयकामुळे सरकारला आता युद्ध तसंच दुष्काळी परिस्थितीत अन्न धान्याचा नियंत्रित पुरवठा करता येणार आहे.
Source – AIR
