कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसाठी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद
नाशिक, दि.७: कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शहर विकास समितीच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले.
घसरलेल्या दरामुळे उत्पादकांना नुकसान सहन करावे लागत आहे, तसेच निर्यातबंदी उठल्यावर कांद्याच्या बाजार भावात सुधारणा होईल, हे मुद्दे आंदोलकांनी यावेळी मांडले.
सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर बाजार समितीत लिलाव नेहमीप्रमाणे सुरू झाले.
