कोविड १९ च्या तुलनेने ओमिक्रॉन संसर्गाची लक्षणं मात्र सौम्य….
कोविड १९ च्या ओमिक्रॉन प्रकाराचा फैलाव झपाट्यानं होत असल्यामुळे आणखी नवीन रुपातला विषाणू तयार होण्याची आणि तो अधिक घातक ठरण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामधे ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे आकडे दररोज नवा उच्चांक गाठताना दिसत आहेत. अमेरिकेत सोमवारी १० लाख ८० हजार २११ नवीन रुग्ण आढळले हा जागतिक उच्चांक आहे. मात्र वर्षाअखेरच्या सुट्टीनंतर प्रथमच नोंद होत असल्याने ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे.
ब्रिटनमधे काल प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्येने २ लाखाचा आकडा पार केला. ऑस्ट्रेलियात ५० हजार तर फ्रान्समधे २ लाख ७० हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. ओमिक्रॉन संसर्गाची लक्षणं मात्र तुलनेने सौम्य असल्याचं दिसतं.
Source-AIR
