मुंबई आणि दिल्लीहून कोलकातासाठी दररोज उड्डाण घेणाऱ्या विमानांवर निर्बंध
मुंबई आणि दिल्लीहून कोलकातासाठी दररोज उड्डाण घेणाऱ्या विमानांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ओमीक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारनं हा निर्णय घेतला असून, येत्या ५ तारखेपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यानुसार, दोन्ही शहरांमधून येणाऱ्या विमानांना केवळ सोमवार आणि शुक्रवार या दोनच दिवशी कोलकाता विमानतळावर उतरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुढील दोन आठवडे सर्वोच्च न्यायालयातील सर्व सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात येणार ओमीक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, आजपासून पुढील दोन आठवडे सर्वोच्च न्यायालयातील सर्व सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. हिवाळी सुटीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे.
Source-AIR
