“राष्ट्रीय स्तरावर एनआरसी प्रक्रिया लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही” – केंद्र सरकार
नवी दिल्ली: ‘एनआरसी’ कायद्या बाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने आज मोठे स्पष्टीकरण दिले. “एनआरसी देशभरात लागू करण्याची कोणती योजना आहे का?” असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना गृहमंत्री नित्यानंद राय म्हणाले, की, “सध्या तरी राष्ट्रीय स्तरावर एनआरसी प्रक्रिया लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.”
या उत्तरवरून ‘एनआरसी’ वरून देशभरात उठलेले वादळ शमेल का हे पाहणे लक्षणीय ठरेल.
