Ashok Chavan 2
महाआघाडीत मनसेला स्थान नाही, काँग्रेसचे राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी मनसेला महाआघाडीत घ्यावे म्हणून काँग्रेस समोर प्रस्ताव ठेवला होता. काँग्रेसचे मनसे बरोबर वैचारिक मतभेद असल्याने मनसेला महाआघाडीमध्ये घेणे अवघड असल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
समविचारी पक्षांचीच आघाडी असावी असे काँग्रेसचे म्हणणे असल्याने मनसेला आघाडीत घेता येणार नाही, असे स्पष्टपणे राष्ट्रवादीला कळवले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
भाजपाचा पराभव करणे हे आघाडीचे ध्येय आहे आणि त्यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत सहभागी व्हावे तसेच प्रकाश आंबेडकर यांना चार जागा देऊ असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
