नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे नेरुळ विभागात कोविड मास स्क्रिनिंग तपासणी
नवी मुंबई: कोरोना बधितांचा शोध वेळेत घेऊन त्यांच्यावर तत्परतेने उपचार व्हावेत व कोरोना ची साखळी खंडित व्हावी याकडे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरुवातीपासून लक्ष देण्यात येत असून कोरोनाचे रुग्ण ज्या विभागात मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत अशा भागांमध्ये महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-१९ मास स्क्रिनिंग शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
काल (दि.२२) सेक्टर ६ सारसोळे गांव नेरूळ भागामध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तेरणा रुग्णालयाच्या वैद्यकीय समूहासह आयोजित मास स्क्रीनिंग शिबिरात ११८ नागरीकांची कोविड-१९ विषयक तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर १६ ए नेरूळ येथेही ८३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. अशाच प्रकारे सेक्टर २ नेरूळ येथे शिरवणे नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर डी. वाय. पाटील वैद्यकीय समूहाने २१४ नागरिकांची कोविड-१९ विषयक तपासणी केली. या मास स्क्रीनिंग कॅम्पमधून कोरोना सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरू करण्यात येत आहेत.
