Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबई महानगरपालिकेकडून ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई महानगरपालिकेकडून ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई, दि.२०: नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सेक्टर ०२ येथे घर क्र. ई-३४९, ई-३५० व ई-४३७ ऐरोली याठिकाणी जी + १ इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवेले होते.

सदर अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी ०३ मजूर, ०१ गॅसकटर, ०२ इलेक्ट्रीक हॅमर व जी विभाग ऐरोली येथील अधिकारी/कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *