Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नव्या लॅब मधून दिवसाला होणार १ हजार कोविड चाचण्या

नेरूळ रूग्णालयातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड -१९ लॅबची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोव्हीड – १९ चाचणी व निदान (Rt-PCR Fully Automatic Lab) प्रयोगशाळेच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दररोज १ हजार कोव्हीड १९ चाचण्या होणारी महानगरपालिकेची स्वतःची लॅब नवी मुंबईकर नागरिकांसाठी उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या लॅबव्दारे २४ तासाच्या आत रिपोर्ट प्राप्त होणार असल्याने लवकर निदान होऊन कोव्हीड १९ चा प्रसार रोखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालकमंत्री महोदयांना लॅबच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री महोदयांनी लॅबमधील उपकरणांची व त्यांच्या कार्यप्रणालीची प्रक्रिया बारकाईने जाणून घेतली व मौलिक सूचना केल्या. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खासदार राजन विचारे, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती विजय नाहटा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *