Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत आवाहन

लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत आवाहन

नवी मुंबई, दि. १५: २५ ठाणे लोकसभा निवडणूकीचे मतदान दिनांक २० मे २०२४ रोजी असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून १४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनाचे औचित्य साधून ऐरोली येथील बाबासाहेबांच्या स्मारकात अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते हे लक्षात घेऊन मतदानाविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्मारकाला भेट दिली असता निवडणूक मतदान विषयक प्रचाराचे काम करणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मतदान करण्याबाबत आवाहन करणारे समुह छायाचित्र काढून त्यांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई, प्रशासन व निवडणूक विभागाचे उपायुक्त शरद पवार, समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ 1 चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, अजय संखे व प्रवीण गाडे, ऐरोली विभाग अधिकारी अशोक अहिरे, समाज विकास अधिकारी सर्जेराव परांडे, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *