Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पंतप्रधान महोदयांच्या वंचित घटकांसाठी पोहोच कार्यक्रमात नवी मुंबईच्या ४० सफाईमित्रांना लाभ

पंतप्रधान महोदयांच्या वंचित घटकांसाठी पोहोच कार्यक्रमात नवी मुंबईच्या ४० सफाईमित्रांना लाभ

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वंचित घटकांसाठी पोहोच कार्यक्रमा’त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वंचित घटकांसाठी देण्यात येणाऱ्या पीपीई किट व आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 40 सफाईमित्रांना लाभाचे वाटप करण्यात आले. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान महोदयांनी लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.
पंतप्रधान महोदयांच्या वंचित घटकांसाठी पोहोच कार्यक्रमाकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लाभार्थी नियोजनाचे नोडल अधिकारी म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे हे नमुंमपा क्षेत्रातील 40 सफाईमित्र लाभार्थ्यांसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.
ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या उपस्थितीत नियोजन भवनामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, ठाणे जिल्हाधिकारी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान महोदयांनी ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी लाभार्थ्यांना लाभाचे वाटप केले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 25 सफाईमित्रांना पीपीई किट आणि 15 सफाईमित्रांना आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *