मागील वर्षीच्या स्पर्धेत सरकारी शाळांचा सहभाग होता, यावेळी आंतरशालेय शाळांनाही सहभाग घेता येणार!
नवी मुंबई, दि. २०: स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आंतरशालेय स्वच्छता दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोबतीने खाजगी शाळेतील विद्यार्थीही आपला सहभाग नोनादावू शकतात. स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.
स्पर्धेचा विषय – स्वच्छ्ता
१) कचऱ्याचे विलगीकरण
२) सिंगल – युज प्लास्टिक वर बंदी
३) खारफुटीचे (Mangrove) संवर्धन
४) जलस्त्रोत (वॉटरबॉडी) स्वच्छ्ता आणि संवर्धन
५) माझी वसुंधरा उपक्रम
६) नवी मुंबईचे शहर सुशोभीकरण
स्पर्धेची नियमावली –
- स्पर्धा फक्त नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत, दोन टप्प्यात होणार आहे. प्रवेश Google Forms द्वारे स्वीकारला जाईल.
- शाळा 15-20 जुलै 2024 दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने स्वच्छतेबाबत जनजागृती सादर करतील.
- सादरीकरणाचे फोटो आणि लोकेशन आवश्यक, अन्यथा प्रवेश अवैध.
- सोशल मीडियावर फोटो अपलोड करून NMMC हॅंडल्सला टॅग करणे अनिवार्य.
- प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. २२ जुलै २०२४
या लिंक द्वारे ताबडतोब नोंदणी करा: https://forms.gle/cE1C2UvnfaTcd3QE8
