Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“….यांच्या मुलीसोबत जर असे काही घडले असते तर आपण त्या आरोपींना सोडलं असतं का?”; नितीन नांदगावकरांचा उद्विग्न सवाल

Featured Video Play Icon

“….यांच्या मुलीसोबत जर असे काही घडले असते तर आपण त्या आरोपींना सोडलं असतं का?”; नितीन नांदगावकरांचा उद्विग्न सवाल

मुंबई: पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईस्थित माटुंगा स्टेशनवर येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींचा विनयभंग करताना एक विकृत येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या घटनेचे तीव्र पडसाद समाजमाध्यमांवरही उमटले. यानंतर पीडित मुलीने तक्रार दाखल न करताही पोलिसांनी या विकृताला अटक केली. ही घटना घडल्यानंतर आबाल वृद्धांचे सुपरहिरो असलेले शिवसेनेचे अँग्रीयंग मॅन नितीन नांदगावकर यांनी निश्चय केला की हा विकृत जसा जेल मधून सुटेल तसा याला कॅमेऱ्यासमोर आणून विशेष प्रसाद देत पीडित मुलीची व समस्त स्त्री वर्गाची माफी मागायला लावायची.

दरम्यान जेल मधून जामिनावर सुटल्यावर हा विकृत जंग-जंग पछाडल्यानंतर अखेर नांदगावकरांना सापडला व काल त्यांनी फेसबुक व्हिडिओ च्या माध्यमातून त्याचा चेहरा बेनकाब केला. याप्रसंगी नितीन नांदगावकर या विकृतावर खासे भडकलेले दिसले. त्यांच्या हातून प्रसाद खात-खात त्याचा गालही लालबुंद झाला, शिवाय ज्या हातांनी तो ही दुष्कृत्य करत होता त्यांनाही नांदगावकरांनी आपल्या दोन्ही पायांच्या टाचेखाली चिरडून टाकले.

अशा घटना घडल्यावर मुलींनी, स्त्रियांनी तसेच त्यांच्या घरच्यांनी कसलीही भीडभाड, लाज-लज्जा न बाळगता पोलिसांत सरळ तक्रार दाखल करण्यास पुढे यायला हवे, जेणेकरून पुढच्यावेळी दुसऱ्याकोणा स्रीसोबत असे दुष्कृत्य घडणार नाही असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अशा वेळी आम्ही शिवसैनिक तुमच्या संरक्षणार्थ पुढे उभे राहू असेही ते म्हणाले.

व्हीडिओच्या शेवटी त्यांनी विचार करायला लावणारा एक गंभीर प्रश्न विचारला की, “पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले आहेत. सन्माननीय कोर्टाचे न्यायाधीश, पोलीस डिपार्टमेंटचे आयुक्त, राजकारणी, व्हीआयपी यांच्या मुलीसोबत जर असे काही घडले असते तर आपण त्या आरोपींना सोडलं असतं का? आपण त्यांना सोडलं नसतं.” जोपर्यंत आपल्यावर आपल्या परिवारावर अशी परिस्थिती ओढवत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं गांभीर्य कळणार नाही असे म्हणत त्यांनी आपला मुद्दा अधोरेखित केला.

अखेर त्यांनी सर्व शिवसैनिकांचा हवाला देत अशा विकृतांची माहिती आम्हाला द्यावी असे आवाहनही सर्वांना केले. नितीन नांदगावकरांच्या फेसबुक पोस्ट ला अखेरीस To Be Continue.. असे लिहिले आहे त्यामुळे पुढच्या भागात ते कोणाचा चेहरा बेनकाब करणार याबाबत सध्या सस्पेन्स आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *