दिग्दर्शक निशिकांत कामात यांच्या मृत्यूची अफवाच; रितेश देशमुख ची माहिती
मुंबई दि.१७: अभिनेते दिग्दर्शक निशिकांत कामात यांच्या मृत्यूबाबतच्या बातम्या सध्या फिरत असून यात तथ्य नसल्याचे अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या ट्विटर हँडल वरून स्पष्ट केले आहे. निशिकांत कामात वर सध्या हैदराबाद येथील एका रुग्णालयात लिव्हर सोरायोसिस या आजारावर उपचार चालू असून तो सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगण्यात येत आहे. पण काही अतिउत्साही मंडळी व काही माध्यमांनी तो मृत झाल्याचे वृत्त प्रसारित केले आहे. याशिवाय काही नेत्यांनीही कामात यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Requesting all the respected Media Houses who reported on #NishikantKamat to put out a clarification please. https://t.co/NPuaccKBac
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 17, 2020