जेएनपीटी अधिकारी मनीषा जाधव यांचे लवकरच होणार निलंबन?
उरण, दि.१३(विठ्ठल ममताबादे): जेएनपीटीच्या कर्मचारी मनीषा जाधव (मॅनेजर P&IR) यांच्याविरोधात आमरण उपोषण कर्ते ॲड. निशांत घरत आणि मुख्य तक्रारदार प्रमोद ठाकूर यांनी मंगळवार दिनांक १२/०४/२०२२ रोजी JNPT चे मुख्य प्रबंधक आणि सेक्रेटरी जयवंत ढवळे आणि मुख्य दक्षता अधिकारी व्हीं. ए. मालेगावकर यांची भेट घेतली. यावेळी आमरण उपोषण सोडताना दिलेल्या आश्वासनामध्ये सांगितल्या प्रमाणे दर सात दिवसांनी सदर प्रकरणात प्रशासनाकडून देण्यात येणारी अद्ययावत माहिती घेण्यासाठी ॲड. निशांत घरत गेले होते. त्यावेळेस जयवंत ढवळे यांनी असे सांगितले की मनीषा जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असून तुम्हाला १/०५/२०२२ रोजी उपोषणाला बसायला लागणार नाही एवढे निश्चित. त्यांच्यावर कधीही बडतर्फ किंवा निलंबनाची कारवाई होवू शकते असे ढवळे यांनी सांगितले. निशांत घरत आणि प्रमोद ठाकूर यांनी नवीन पुरावे आणि शासन निर्णय सादर करून मनीषा जाधव यांच्या विरोधातली तक्रार आणखीन मजबूत केली आहे.
जेएनपीटीचे मुख्य दक्षता अधिकारी व्ही. ए. मालेगावकर यांना जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील यांनी सुरुवातीपासूनचा इतिहास विस्तृतपणे समजावून सांगितला. यावर मालेगावकर यांनी याप्रकरणी निःपक्षपाती चौकशी करून सीव्हीसी च्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. एक मात्र निश्चित आहे की जेएनपीटी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानूसार जर ३० एप्रिल पर्यंत जर समाधानकारक कारवाई झाली नाही तर निशांत घरत १ मे पासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत हे निश्चित झाले आहे. आणि त्यावेळेस ज्या जेएनपीटी प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या विरोधातच आमरण उपोषणाला निशांत बसणार आहेत. ॲड. निशांत घरत उपोषणकर्ते तथा माजी सरपंच नवीन शेवा हे आपल्या मागणीबाबत ठाम आहेत. प्रमोद रामनाथ ठाकूर मुख्य तक्रारदार हे सुद्धा या विरोधात आवाज उठवत आहेत.
