निर्मला सीतारामन यांचं न्यूयॉर्क येथील गोलमेज परिषदेत प्रतिपादन
न्यूयॉर्क: पायाभूत सुविधा क्षेत्रात परदेशी गुंतवणूक सहज करता यावी, यासाठी भारताने वित्तीय लाभासह अनेक सुधारणा केल्या असल्याने गुंतवणूकदार आणि उद्योगांसाठी भारतात चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. फिक्की आणि यू एस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम यांनी न्यूयॉर्क येथे आयोजित केलेल्या जागतिक गुंतवणूदार आणि नेत्यांच्या गोलमेज परिषदेत त्या बोलत होत्या. सध्या जागतिक पुरवठा साखळीत झालेला बदल आणि भारताचं स्पष्ट भूमिका आणि बांधिलकी असलेलं नेतृ्त्व यामुळे भारतात गुंतवणुदारांसाठी संधी असल्याचं त्यांनी सांगितलं. कोविड-१९ च्या आवाहनात्मक काळात भारताने डिजीटायझेशनच्या आवाक्याचा संपूर्ण लाभ घेतला आहे. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाची भूमिका वित्तीय समावेशनाला चालना देणारी आहे, असं त्या म्हणाल्या. भारतात स्टार्टअपची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून, त्यातल्या अनेकांनी भांडवल बाजारातून पैसा उभारला आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
Source-PIB
