दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या चार दोषींना फाशी देण्याचे न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली: दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या, चार दोषींना येत्या २२ जानेवारीला फाशी देण्याचे आदेश दिल्लीतल्या पतियाळा न्यायालयानं आज दिले. या चारही दोषींनी २२ जानेवारीला सकाळी सात वाजता तिहार कारागृहात फाशी दिली जाणारा आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांनी या चौघांना फाशी देण्याचं अधिकृत फर्मान आज जाहिर केलं. २०१२ च्या डिसेंबर महिन्यात ही घटना घडली होती. मुकेश, विनय शर्मा, अक्षय सिंह, पवन गुप्ता या चौघांना फाशी दिली जाणार आहे.
(Credit – AIR)
