पहा ‘घोटाळेबाज’ नीरव मोदी चा नवा लुक

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमख आरोपी नीरव मोदी ह्याच्या विरुद्ध जरी इंटरपोल ने रेड कॉर्नर नोटीस काढली असली तरी तो लंडन मध्ये मुक्त संचार करतोय. नुकताच ‘द टेलिग्राफ’ त्या संदर्भातील वृत्त देऊन त्याचा नवा लुक सर्वांसमोर आणला आहे. तो लंडन मधील वेस्ट एन्ड परिसरातील सेंटर पॉईंट टॉवर नामक आलिशान अपार्टमेंट मध्ये राहत असल्याचा त्यांनी दावा केला आहे. द टेलिग्राफ च्या प्रतिनिधीने त्याचाशी वार्तालापही केला. १३ हजार कोटींचा चुना लावलेल्या नीरव मोदीला भारतात आणणे सध्यातरी सरकारच्या आवाक्यात नाहीये इतके नक्की.
