केंद्रिय राखीव पोलिस दलाचे महासंचालक
कुलदिप सिंग स्वीकारणार ‘एनआयए’ चा अतिरिक्त कार्यभार
नवी दिल्ली: राष्ट्रीय तापास यंत्रणेचे(एनआयए) चे प्रमुखपद सध्या रिक्त आहे. केंद्रिय राखीव पोलिस दलाचे महासंचालक कुलदिप सिंग यांच्याकडे एनआयए चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. केंद्रीय गृह विभागाने ही नियुक्त करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
ही अतिरिक्त जबाबदारी ते या महिन्याच्या ३१ तारखेपासून स्विकारणार आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदावर पुढील नियुक्ती होईपर्यंत ते हा अतिरिक्त पदभार स्वीकारणार असल्याच गृह विभागानं म्हटलं आहे. सध्या NIA कडे अंटालिया हिल स्फोटक प्रकरण असून देशातील अनेक मोठी प्रकरणं त्यांच्याकडे आहेत.
Source/Photo Credit – AIR
