स्टॉकहोम जाहीरनाम्यात निश्चित केलेली जागतिक रस्ते सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा गडकरी यांनी केला पुनरुच्चार
नवी दिल्ली, दि. २: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चेक प्रजासत्ताकामधील प्राग येथे 27 व्या जागतिक रोड काँग्रेसमध्ये रस्ते सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मंत्रीस्तरीय अधिवेशनाला संबोधित केले.
सर्व स्तरावरील हितधारकांनी रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारावा असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. वर्तणुकीत सकारात्मक बदल व्हावा आणि नियमांची निर्दोष अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी भारताने जागरूकता निर्माण करण्यावर भर दिल्याचा त्यांनी पुनर्विचार केला.

न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम (NCAP) यासारख्या भारताने हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांसह ऑटोमोबाईल सुरक्षेच्या क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिली, त्याचबरोबर स्टॉकहोम घोषणेमध्ये निश्चित करण्यात केलेले जागतिक रस्ते सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
Addressing 27th World Road Congress in Prague, Czech Republic. #WorldRoadCongress #RoadSafety https://t.co/tW26rA5YJT
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 2, 2023
