देशाच्या कृषीक्षेत्रासाठी हा एक क्रांतिकारक क्षण असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं शेतकऱ्यांचं अभिनंदन
नवी दिल्ली: संसदेत कृषीविषयक दोन महत्वाची विधेयक संमत झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याचं अभिनंदन केलं आहे. देशाच्या कृषीक्षेत्रासाठी हा एक क्रांतिकारक क्षण आहे, यामुळे कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल होऊन कोट्यावधी शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होणार आहे, असं ते म्हणाले.
कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी समाधान व्यक्त केलंय. आजचा दिवस देशाचं कृषिक्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचा दिवस आहे, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
या विधेयकांमुळे, शेतकऱ्यांना आपला माल चांगल्या किमतीत कुठेही विकणं शक्य होणार आहे. बाजार समित्यांच्या बंधनातून तो मुक्त झाला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली.
