नागपूर मनपाच्या ‘आयईसी’ चमूद्वारे नेहरूनगर झोन प्रभाग २६ येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आयोजित स्वच्छता कार्यशाळा संपन्न
नागपूर, दि. २२: नागपूर महानगरपालिकेच्या ‘आयईसी’ चमूद्वारे नेहरूनगर झोन प्रभाग २६ येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता कार्यशाळेचे आयोजन आज दि. २२ मे २०२४ रोजी करण्यात आले होते. कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातून निघणाऱ्या ओला आणि सुका कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्या कचऱ्याला कचरागाडी मध्ये टाकण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने स्वच्छतादूत हजर होते. अशाच प्रकारे नागपूर महापालिकेच्या इतर प्रभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल व पालिका हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचे कार्य सुरळीत होईल.
