Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पात्रता प्रवेश परीक्षेचा(NEET-PG) निकाल जाहीर

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पात्रता प्रवेश परीक्षेचा(NEET-PG) निकाल जाहीर

नवी दिल्ली: वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट-पीजीचा निकाल जाहीर झाला आहे. ‘एनबीईएमएस’ने अर्थात वैद्यकीय विज्ञान राष्ट्रीय परीक्षा मंडळानं केवळ दहा दिवसांच्या विक्रमी कालावधीत हा निकाल जाहीर केला. विद्यार्थी natboard.edu.in या संकेतस्थळावर आपला निकाल बघू शकतात. गेल्या २१ मे रोजी  ही परीक्षा झाली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी एका ट्वीटद्वारे परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्यांचं अभिनंदन केलं आहे, तसंच मुदतीआधी निकाल जाहीर केल्याबद्दल मंडळाचं कौतुक केलं आहे.

सर्वसाधारण प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पात्रता गुण २७५, तर दिव्यांग प्रवर्गासाठी २६० आणि अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २४५ गुण असल्याचं मंडळानं म्हटलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *